" आपला संसार "
" आपला संसार "
थोडं तू समजून घे,
थोडं मी समजून घेईल,
असाच तर आपला संसार सुंदर होईल....
कधी भांडणात तू माघार घे,
कधी माघार मी घेईल,
असाच तर आपला संसार सुंदर होईल....
आजचा राग आजच सोडून दे,
मी पण परिस्थिती सांभाळून घेईल,
असाच तर आपला संसार सुंदर होईल....
खुप काही मागणार नाही,
आहे त्यात समाधानी राहील,
असाच तर आपला संसार सुंदर होईल....
एकमेकांना समजून घेत आयुष्य
असचं बहरत राहील,
असाच तर आपला संसार सुंदर होईल....
प्रियांका खरात ✍️
Comments
Post a Comment