Posts

Showing posts from December, 2022

"असावं कोणीतरी..."

"असावं कोणीतरी..." वाटतं कधी कधी असावं कोणीतरी, मला समजून घेणारं, मी आहे तसं मला स्वीकारणारं, माझ्या हसण्याचं कारण बनणारं, तर कधी माझा राग घालवणारं मला मनवणारं...... आयुष्याच्या वाटेवर एखाद्या वळणावर भेटेल का कोणी मला साथ देणारं....? खुप दूरवर आहे प्रवास असेल का कोणी माझी सोबत करणारं....? खरंच वाटतं कधी कधी असावं कोणीतरी मला समजून घेणारं.....                                   प्रियांका खरात ✍️

"नवी सुरुवात...?? "

"नवी सुरुवात...?? " संपलय सगळं की, नवी सुरुवात म्हणू..? रडू थोडसं की, चेहर्‍यावर थोडं हसू आणू..? परके वाटतात सगळे, आता कोणाला आपलं म्हणू..? जीवन कठीण वाटतयं, जसे जगणे माहीतच नाही जणू..? होईल एक दिवस मनासारखे, हे सुध्दा एक गोड स्वप्न म्हणू..? संपलय सगळं की, नवी सुरुवात म्हणू..?                                 प्रियांका खरात✍️

तू....♡

    तू....♡    कधी स्वप्न तू....    कधी आस तू....    तर कधी मनाचा ध्यास तू....     कधी आठवण तू....     कधी गोड क्षणांची साठवण तू....     तर कधी दुःखाची पाठवण तू....                 कधी साथ तू....      कधी अडचणीत धरलेला हाथ तू....      तर कधी मनातील खून गाठं तू....                  कधी विसावा तू....      कधी हवासा तू....      तर कधी नवासा तू...      पण फक्त तू....                                     प्रियांका खरात ✍️