" उद्याच्या सुखासाठी...."
" उद्याच्या सुखासाठी...."
उद्याच्या सुखासाठी,
थोडं सहन करावेच लागेल...
जरी अत्ता दुखः असले,
तरी ते पचवावे लागेल...
खुप अडकून काही मिळत नाही,
त्या गोष्टींमधून बाहेर पडावे लागेल...
परिस्थिती समजून घेत,
अनुभवातून शिकावे लागेल...
वाट कितीही सहज दिसली,
काट्यांच भान ठेवावे लागेल...
उद्याच्या सुखासाठी,
थोडं सहन करावेच लागेल...
प्रियांका खरात✍️
खुप छान☺️☺️
ReplyDeleteThanks
ReplyDelete