Posts

Showing posts from January, 2023

" माझं बाळ "

" माझं बाळ " उसने का होईना मला बाळ झाले, जेव्हा माझ्या बहिणीच्या पोटी बाळ कृष्ण आले, जरी असले रुप त्याचे सावळे, तरी तो करी सर्वाना बावळे.. 'मम्मा' असे उच्चार जेव्हा त्याच्या मुखी  माझ्यासाठी आले, मग काय तिथेच मी फसले, पण ना जाने का या गोड आठवणीत कित्येकदा हसले.. असला जरी लहान तरी कधी वाटे याच्यामध्ये शहाणपण कुठून आले, तु वागशील ना शहाण्या सारखा..उगीच हे विचार मनी आले, मुलं मोठी होऊन जे वागतात ते संस्कार ठरवते की संगत हे अजून कोणाच्या ध्यानी नाही आले, पण एक सांगते जेव्हा साकेतचा जन्म झाला तेव्हा गोंडस निरागस बाळ जन्माला आले, उसने का होईना मला बाळ झाले, जेव्हा माझ्या बहिणीच्या पोटी बाळ कृष्ण आले, मी मम्मा झाले.....                                     प्रियांका खरात✍️           

" वेड "

   " वेड " समोरच्या व्यक्तीकडून कोणतीच अपेक्षा न ठेवता जीव लावणं म्हणजे वेड.... त्या व्यक्तीच्या आनंदात आनंद मानणं म्हणजे ते वेड.... तो कितीही भांडला तरी त्याला समजून घेणं म्हणजे वेड.... प्रत्येक क्षणात त्याचा सहवास असणं म्हणजे वेड.... एकमेकांमध्ये हरवून जाणं म्हणजे वेड.... नुसते वेड नाही प्रेमाचे वेड आणि ते फक्त तुझ्यासाठीच आहे.....♡                         प्रियांका खरात✍️