" का जगते....? "
" का जगते....? " माहीत नाही का..? पण जगते आहे.., रोज नवीन स्वप्न बघते आहे.., स्वप्न पुर्तीच्या मोहात उगीचच धावते आहे.., कितीही धडपड केली तरी हात आजही रिकामे आहे.., ना कोणाची साथ...ना कोणती सोबत...पदरी फक्त एकांत आहे.., संपलय का सगळं की ही एक सुरुवात आहे.., अपेक्षा मात्र काही संपत नाही..जरी आयुष्यात सगळा अंधार आहे.., माहीत नाही का..? पण जगते आहे.. प्रियांका खरात ✍️