तू हवासा मला.....♡
तू हवासा मला.....♡
कधी पावसात भिजताना,
तर कधी थंडीत शेकोटी करताना,
तू हवा आहेस मला आयुष्याची स्वप्न पाहताना....
कधी भांडताना कधी रुसताना,
तर कधी समजून घेताना,
तू हवा आहेस मला आयुष्याची स्वप्न पाहताना....
कधी उगाच उनाडपणे फिरताना,
तर कधी शांत निवांत निसर्गाचा आनंद घेताना,
तू हवा आहेस मला आयुष्याची स्वप्न पाहताना....
कधी भविष्याचा विचार करताना,
तर कधी जुन्या आठवणीत रमताना,
तू हवा आहेस मला आयुष्याची स्वप्न पाहताना....
प्रियांका खरात ✍️
Comments
Post a Comment