" नातं "
" नातं "
नाजूक नात्या मधील प्रत्येक धागा जपायला हवा,
कधी तू तर कधी मी एकमेकांना आधार द्यावा,
प्रत्येक निर्णय घेताना आपण एकमेकांचा सल्ला घ्यावा,
आपण कितीही चिडलो तरी एकमेकांचा हात घट्ट धरावा,
भांडण होणारच नाही हे काही शक्य नाही पण त्यामुळे. आपल्यात दुरावा नसावा,
कधी अबोला धरलाच तर तो काही क्षणांपेक्षा जास्त. नसावा,
नाजूक नात्या मधील प्रत्येक धागा जपायला हवा....
प्रियांका खरात ✍️
Comments
Post a Comment